धानोरा तालुक्यात गळफास घेऊन प्रेमीयुगलांची आत्महत्या..
धानोरा तालुक्यात गळफास घेऊन प्रेमीयुगलांची आत्महत्या..
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/रांगी-धानोरा : तालुका मुख्यलयापासून पासून जवळ असलेल्या एक किलोमीटर अंतरावर चव्हेला रोड लगत कपार्टमेट ५२० मध्ये काल गुरुवार २९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन जिवनयात्रा संपविल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विद्या सदाशिव उसेडी (२०) रा. पवणी व राजेश लाल पोटावी (२८) रा. दराची दोघेही धानोरा तालुक्यातील असून कपार्टमेट नबर ५२० मध्ये एका झाडाला एकाच फादीला गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्याने ओढणीने गळफास घेतली तर राजेशने दुपट्टाच्या साहाय्याने गळफास घेतली. मृतक प्रेमीयुगल रात्रीपासून बेपत्ता होते. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. मृतकाच्या सदस्यांनी रात्री पासून त्यांचा शोध घेतला असता आज सकाळीच्या सुमारास दोघेही झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहे.



