पोलीस बॉईज असोसिएशन कल्याण शहर अध्यक्ष पदी इम्रान मोमीन यांची निवड
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी दिले नियुक्तीपत्र
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी कल्याण:-दिनांक २६आक्टोबर रोजी कल्याण ( ठाणे जिल्हा ) येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज इम्रान इरशाद मोमीन यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या कल्याण शहर अध्यक्ष पदी निवड केल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सय्यदराजा मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे,इम्रान मोमीम हे सन २०१७ पासून पोलीस बॉईज असोसिएशनचे सदस्य म्हणून काम करत होते त्यांनी आत्तापर्यंत केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्यामुळे त्यांची कल्याण शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे इम्रान मोमीम यांनी वेळोवेळी पोलीस बॉईज असोसिएशनच्या आंदोलनात सहभाग घेतला आहे, तसेच पोलीसांच्या अडचणीला ते सदैव धाऊन जातात, त्यांच्या या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सय्यदराजा मुजावर व मुंबई प्रदेश संघटक संजय डे तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष शैलेश पांडव यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
t



