राजूर येथे ईद निमित्त परमवीर अब्दुल हमीदच्या तैलचित्राचे अनावरण
● परमवीर शहीद अब्दुल हमीद यांच्या प्रबळ देशभक्ती व बलिदानामुळे १९६५ ला भारताने पाकिस्तानला हरविले…कॉ. गीत घोष
राजूर कॉलरी : “१९६५ ला पाकिस्तान ने बलाढ्य अमेरिकेच्या साहाय्याने भारतावर युद्ध लादले असताना भारतीय सैन्यात असलेले अब्दुल हमीद यांच्या ठायी असलेल्या जाज्वल प्रबळ देशभक्तीमुळे आणि त्यांनी केलेल्या बलिदानामुळे भारताला त्या युद्धात पाकिस्तान ला हरवून जित मिळविता आली”, असे रोख ठोक प्रतिपादन राजूर येथे ईद ए मिलादूनबी ह्या दिनाचे औचित्य साधून परमवीर अब्दुल हमीद चौकातील शहीद अब्दुल हमीद यांच्या नवीन तैलचित्राचे अनावरण प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून केले.
परमवीर चक्र शहीद अब्दुल हमीद यांच्या नवीन तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाकप चे कॉ. सुनील गेडाम हे होते, उदघाटक म्हणून प्रसिद्ध चित्रकार असित तेलंग तर प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे कॉ. गीत घोष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मारोती पाटील बलकी, पोलीस पाटील सरोज मुन, वामनपाटील बलकी, अब्दूल हुसेन शेख, छोटूभाऊ श्रीवास्तव, कवी संजय पाटील, नजीम शेख, कॉ कुमार मोहरमपुरी, जयंत कोयरे, प्रा अजय कंडेवार, साजिद खान, संजय काटकर, कवी-गायक राजेंद्र पुडके, श्रीनिवास कलवलवार हजर होते.
कॉ गीत घोष पुढे बोलताना म्हणाले की, “शहीद अब्दुल हमीद यांनी धर्माच्या आधारावर बनलेल्या पाकिस्तान ला हरविण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले, त्यांनी धर्मापेक्षा देशाला महत्व दिले, परंतु आज आपल्या देशात धर्माचे नावावर राष्ट्राची ओळख निर्माण करण्यासाठी देशातील जनतेमध्ये फूट पाडून दंगे घडवून आणत सत्तेचे राजकारण करीत आहेत, हे ते लोक आहेत ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कसलेही योगदान दिले नाही, आज तेच देशाला राष्ट्रवाद शिकवीत आहेत”, असेही गीत घोष म्हणाले.
या परमवीर शहीद अब्दुल हमीद यांच्या नवीन तैलचित्राचे अनावरण येथील प्रसिध्द चित्रकार व पेंटर असित तेलंग यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना कॉ कुमार मोहरमपुरी यांनी तर संचालन महेश लिपटे सर यांनी केले आणि आभार जयंत कोयरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मो.नूर, ताहीद शेख, अक्षय खोब्रागडे, मंगल टिपले,अजीम शेख, गणेश कुमरे,महेश भगत,गोविंद डवरे, शेख नजीर, प्रज्वल रायपुरे आदींनी अथक परिश्रम घेतले.



