Vidarbh24News

Latest Online Breaking News

मरणानंतरही नरक यातना का ? राजुर गावात स्मशानभूमि कधी उपलब्ध करुन द्याल ?ग्रामस्थानी दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन

वणी -राजुरा गाव सर्वात मोठा गाव म्हणून ओळख आहे. पण तरीही या गावात  स्मशानभूमीचा विकास आजतागायत करण्यात आलेला नाही .तसेच सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून सुद्धा खूप मोठीओळखआहे. शासनाकडून प्राप्त संस्थान भूमीचा नियोजित जागा असून सुद्धा जनतेला इतर गावाच्या शिवारातील स्मशानभूमी दहन करावे लागत आहे.

.

राजुर ग्रामपंचायत ने एका शिवारातील जागेची कायदेशीर मोजणी केली. तिथे ग्रामपंचायत मार्फत कंपाऊंड सुद्धा करण्यात आले.तरीही काम हे अपूर्णच का ? परंतु ती सदर जागा आतापर्यंत जनतेला का सुपूर्द केली नाही.2017 मध्ये ग्रामपंचायत मध्ये ठराव पास झाला.परंतु आजपर्यंत त्या जागेचे सौंदर्य करून मयत लोकांच्या दहनासाठी का उपलब्ध करून दिली नाही ?  फक्त ग्रामपंचायत  पाठपुरावाच करणार की प्रश्न निकाली लावणार ?  असा सवाल गावकरी करत आहे. आज दि 29 /10/2020 रोजी गावकऱ्यांनी अशी मागणी केली की, ती जागा सर्वधर्मीय व्यक्तीसाठी स्मशानभूमी म्हणून वापर करू द्यावी व तिथे लवकरात लवकर विकास कामे – शेड ,रस्ता व सौंदर्यीकरण करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आज या निवेदनातून केली आहे .काय ही राजुर ग्रामपंचायत ची गत ! राजुर ग्रामपंचायत नेमकी आतापर्यंत काय करत होती ?

मरणानंतरही मयत व्यक्तीला सुद्धा मरण यातना या गावात भोगावी लागणार का ? असा सवाल गावातील लोकांसमोर उपस्थित झाला आहे.आजच्या निवेदनातून स्मशानभूमीचे विकास कामे त्वरित मंजूर करा व स्मशानभूमी राजुरवासीना लोकार्पण करा ! असे निवेदन दिले गेले आहेत .यावर ग्रामपंचायत नेमके कोणते पाऊल उचलणार?  याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!