Vidarbh24News

Latest Online Breaking News

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान…

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान…

पं. स. सावली चे सभापती श्री. विजय कोरेवार यांचे शेतकरी बांधवाना आव्हान….. 

कवठी प्रतिनिधी :-      वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान भरपाईसाठी सावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. असे आव्हान पंचायत समिती सावली चे सभापती श्री. विजय कोरेवार यांनी केले आहे.                                               चंद्रपूर जिल्यातील सावली तालुक्यात धान पिकांचे उत्पन्न मोठया प्रमाणात घेतले जाते. यातूनच शेतकरी वर्गाचे उदरनिर्वाह चालतो. सुरुवातीला आलेल्या कृत्रिम पुरामुळे आणि त्यानंतर वातावरण बदलामुळे धान पिकांवरील रोगाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आधीच मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने आणि शेतमालाला योग्य हमीभाव नसल्याने शेतकरी आधीच हैराण आहे. अशातच आता रान डुक्कर आणि इतर प्राण्यांनी शेतातील कापणीस आलेले उभे पीक नष्ट केलेले आहे.                                                               तालुक्यातील डोलदार उभे पीक कापणीस आलेले आहे, परंतु रात्रीच्या वेळेस रान डुक्करांच्या झुंडी आणि इतर प्राण्यांनी शेतपिकांमध्ये शिरून हजारो एकरातील धान पिकांची नासाडी करीत आहेत. कष्ट करून हाती येणारे पीक मातीमोल होत असल्याने वनविभागाकडून भरपाई मागण्याचा हक्क आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या भागातील वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे नुकसान भरपाई अर्ज, सातबारा, नकाशासह सादर करावे व अर्ज करताना पोच पावती घ्यावी, असे आव्हान पं. स. सावली चे सभापती श्री. वि. कोरेवार यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!