Vidarbh24News

Latest Online Breaking News

ओ.बी.सी जातिनिहाय जनगणना जनजागृती मोहीम.

 

वणी –  विजयादशमीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून अत्यंत उत्साहामध्ये जनगणना रॅली काढण्यात आली. यावेळी “ओबीसींची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे”
“जय ओबीसी,जय संविधान” या घोषणांनी वातावरणात उत्साह संचारला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित लोकांना जनगणनेची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. त्याचबरोबर जातिनिहाय जनगणना महत्त्व आणि गरज याविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली

तसेच, विविध पक्ष, विचारधारा,संघटनामध्ये विभागलेल्या ओबीसी जातीबांधवांना या मोहिमेत सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले.दिनांक 26 ऑक्टोबर 2020 ते 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत सलग 18 दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वणी व मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात दौरे काढून ओबीसींच्या जातनिहाय जनगणनाविषयी लोकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी अंबादास वागदरकर, भाऊसाहेब आसुटकर,ऋषीकांत पेचे,संजय चिंचोलकर,राजू तुरानकर,प्रविण खानझोडे,प्रदीप बोरकुटे, अजय धोबे,संजय पेचे मारोती जिवतोडे, मारोती मोडक, मंगेश खामनकर,अमोल टोंगे, दत्ता डोहे,नितीन मोवाडे, नरेंद्र गायकवाड विकेश पानघाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!