वार्ड नं 4 राजुर मधे ग्रामपंचायतने मागील काही वर्षापासून विकास काम का केले नाही ? व घरकुल लाभार्थ्याना घर दया व ताबड़तोब विकास काम करा ! — नागरिकांनी दिले निवेदन

वणी – राजुर गावातील ह्या वार्डाची विशेषतः म्हणजे हा वार्ड. क्र 4 वे.को.ली प्रशासन व रेल्वे प्रशासन ह्या क्षेत्रामध्ये विभागलेला आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून येथे कामगार मोठ्या संख्येने स्वतःची घरे बांधून राहत आहेत. ह्या घरांना ग्रामपंचायत कडून नियमीतपणे दरवर्षी घर कर, पाणीकर, दिवाबत्तीकर तसेच वीज विभागाकडून देण्यात आलेल्या विजेच्या बिलाची आकारणी सुद्धा केल्या जाते आहे. असे असतानाही ह्या क्षेत्रात नागरी सुविधा का दिल्या गेल्या नाहीत,रस्ते बनविले नाही,नाल्यामधे पाइप टाकन्यात आले नाही ,अशा प्रकारे वारंवार म वार्ड क्र 4 च्या लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले .
मागील काही वर्षापासून दिशाभूल सुद्धा करण्यात आली .ह्या सर्व सेवा देण्याची जवाबदारी कोणाची आहे हा प्रश्न आपल्या कडे मांडण्यात येत आहे. ? फक्त नाली साफ करणे ,लाइट लावणे ,हेच ग्रामपंचायतेचे काम आहे का आणि तेही फक्त तोंड पाहुन गावाच्या विकास केला की क़ाय ? आता पर्यंत सवाल नागरिक करत आहे.
आपल्या ग्रामपंचायत कडून नागरी सुविधा देण्या व विकासापासूनच नाही तर येथे राहणाऱ्या लोकांना घरकुल योजनांपासूनही वंचित करून ठेवण्यात आले आहे. ह्या वार्डात राहणारे बहुतांश नागरिक दारिद्र्य रेषेखालील असून त्यांना घरकुल योजनेचा लाभ अवश्य मिळायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांची नावे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समावेश असतानाही निव्वळ स्वतःची जागा नाही त्यांना दिशाभूल करुन त्या गरीबांना मागील 5 वर्षा पासून योजनेचा लाभापासून उड़वा उडविचे उत्तर देऊन वंचित करण्यात येत आहे की क़ाय ?
हे सरळसरळ गरिबांना त्यांच्या हक्काचा घरापासूनच वंचित करणे आहे. एकीकडे केंद्र सरकार एकाही व्यक्तीला, कुटुंबाला घराविना ठेवणार नाही असे जाहीर करते व त्याकरिता योजना तयार करते. ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही त्यांना जागा विकत घेऊन घरकुलाचा लाभ देण्यात येईल असे सांगते तर दुसरी कडे ह्या योजनांचा लाभ देण्याची जवाबदारी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर म्हणजेच आपल्या ग्रामपंचायत वर आहे तेच गरिबांची वैरी बनून कारभार करीत आहे व ग्रामपंचायत येथे जाणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला दिशाभूल करुन त्यांना वापस घरच्या अहेर दाखवित असल्याचे चित्र दिसून येते.
ह्या वार्ड क्र. ४ मध्ये राहणारे नागरिक रस्त्यांसाठी, पाण्यासाठी, सांडपाण्याच्या नालीसाठी कित्येक वर्षांपासून आपल्या ग्रामपंचायत कडे वाट पाहत आहेत, परंतु मागील 5 वर्षा पासून ह्या कडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आलेली आहे. आता ह्या निवेदनाद्वारे आपल्या कडे ताबडतोब ह्या वार्डात नागरी सुविधा देण्याचा व विकासात्मक कामे सुरू करण्याची तीव्र स्वरूपाची मागणी करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात ज्या ज्या ठिकाणी रस्ते ,नालीचे काम नाही झाले आणि वार्ड क्र.4 जिथे जिथे अत्यावश्यक अश्या ठिकाणी ताबड़तोब विकास कार्यास , घरकुलची जागा उपलब्ध करुन , घरकुल बांधून द्यावे. असे निवेदन वार्ड क्र 4 च्या नागरिकांनी दिले.
आपल्या विभागाकडून कामाची सुरुवात न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन प्रा.अजय कंडेवार, समय्या कोंकटवार ,आशा रामटेके व वार्ड क्र 4 च्या महिलांद्वारे छेडण्यात येईल व ह्याची सर्वस्वी जवाबदारी ग्रामपंचायतेची राहील ह्याची नोंद घ्यावी.