नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ बॅचचे ६६९ प्रशिक्षणार्थी असलेले पुरुष व महिला पोलीस उपनिरीक्षक यांना दिवाळीत किमान ०८ दिवस तरी सुट्टी द्या
-पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईमेलद्वारे निवेदन देऊन केली मागणी
-संपूर्ण महाराष्ट्रातून दिले जाणार निवेदन
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
उस्मानाबाद:- गेल्या १० महिने पासून नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ बॅचचे ६६९ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांना आपल्या गावी जाण्यासाठी दिवाळीत किमान ०८ दिवस तरी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना दिनांक २३आक्टोबर रोजी ईमेलद्वारे केली आहे तसेच या मागणीचे सविस्तर निवेदन सोमवारी दिनांक २६आक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकारी यांचे मार्फत गृहमंत्री साहेबांना दिले जाणार असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343



