प्रेमी युगलांनी वैनगंगा नदीत उडी घेऊन केली आत्महत्या
आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास मुलगा आणि मुलगी वैनगंगेच्या पुलावर दुचाकी ठेवून नदीत उडी घेतली. काही प्रत्यक्षदर्शीनी याची माहीती सावली पोलीस स्टेशन ला दिली. होंडा डिवो या दुचाकी वरुन रामनगर गडचिरोली निवासी 18 वर्षीय प्रतिक किशोर गिरडकर असल्याचे समजले. त्यानंतर याची माहीती 16 वर्षीय काजल अरविंद नागोशे हिच्या वडीलांना त्यांच्या एका नातेवाईकांनी भ्रमणध्वनी द्वारे दिली. उडी घेण्यापुर्वी काजल च्या वडीलांनी प्रतीक च्या भ्रमणध्वनी वर काल करुन काजल ला घरी येण्यास सांगीतले. त्यानंतर त्यांनी याची माहीती गडचिरोली पोलीस स्टेशन ला दिली. काजल आणि प्रतीक रोज सकाळी 4 वाजताच्या सुमारास मार्निंग वाकला जात होते. विशेष म्हणजे या प्रेम प्रकरणाची माहीती काजलच्या वडीलांना होती तर प्रतीक चे वडील अनभिन्न असल्याचे सांगीतले. या प्रेमी युगलानी इतक्या टोकाची भुमीका का घेतली हा शोध विषय आहे. पोलीस रेस्क्यू करत असुन अध्याप पर्यंत या प्रेमी युगलांचा शोध लागलेला नाही.



