वाघोली येथे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य, गावातील प्रशासन निद्रावस्थेत

पांढरकवडा – तालुक्यातील वाघोली गाव हे खरंतर चौफुली म्हणून ओळख आहे. मात्र याच वाघोली या गावाचा चेहरा गेल्या काही दिवसांपासून विद्रूप होत चाललेला आहे. मागील काही दिवसापासून तब्बल 3 ते 4 टन कचरा गावाचा रस्त्यावर साचुन असलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीत गाव म्हणून ओळखला जात आहे . गावचा सुरुवाती पासुन तर बाजार वाडीपर्यंत फक्त आणि फक्त कचरा दिसून येत आहे .या गावची दयनीय अवस्था पाहुन प्रशासन झोपी गेला की काय? व लोकांच्या आरोग्याची खेळत आहे की काय? असे चित्र या गावात घाणीचा साम्राज्यातून दिसून येत आहे .तसेच गावाचा रस्त्याचा अगदी बाजुलाच मोठ मोठे कचरयाचे ढिगारे सुद्धा दिसून येत आहे .तसेच मोठ्या प्रमाणात घाण होताना दिसत आहे .तिथे मोठ्या कचरा कुंड्यांची व्यवस्था सुद्धा नाही, म्हणून नागरिकांची दुर्दैवी अवस्था झाली आहे. नेमका कचरा कुठे टाकायचा ? हा सुद्धा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झाला आहे .येथील सुस्त प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहेत .वाघोली गाँव तालुक्यात चौफुली गाँव म्हणून म्हटल्या जाते .इथे लहान सहान कचरा कुंडीची सुद्धा व्यवस्था नाही .परन्तु गावची लोकसंख्या बघता येथे मोठ्या कचरा कुंडीची गरज आहे. पण पिण्याचा पाण्याची सुद्धा व्यवस्था ही घाणीतच आहे .ही घाण वार्ड नं 1 पासून ते वार्ड नं 2 पर्यंत फक्त आणि फक्त कचर्याचे ढिगारे खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत

म्हणजेच कोरोनाची साथ असताना सुद्धा ,डेंग्यू ,मलेरिया ,टायफाइड ह्या सारख्या आजराला स्वतः गावातील प्रशासनच निमंत्रण देत आहे की क़ाय ? नागरिकांचा समस्या सोडविन्या ऐवजी त्या समस्या वाढतांनाच दिसत आहे.त्यासाठी जबाबदार किंवा संबधित अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासकांनी वाघोली गावाची पाहणी करून मोठ्या कचर्याची कुंडी ,स्वच्छतेची व पर्यावरण स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी. अन्यथा प्रशासन झोपी गेले असेल तर त्यांना उठवण्याचे कार्य गावातील नागरिक देखील करू शकेल अशी चर्चा गावात रंगू लागली आहे.



