माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न…
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न……
चंद्रपूर : दि. २२/१०/२०२० माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष साहेब यांचे सूचनेनुसार, आज दिनांक २२/१०/२०२० ला इंडिया 24 न्यूज नेटवर्क चॅनल च्या चंद्रपूर येथील बिल्डिंग मध्ये माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची चर्चा सत्र बैठक या सभेचे मुख्य मार्गदर्शक या समितीचे “महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष” मा. तुळशीराम जांभूळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत सुरुवातीला या समितीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. करण कोलगुरी सर यांचे हस्ते मा. जांभुळकर साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. त्यानंतर मा. जांभुळकर सरांनी मोलाचे मार्गदर्शन करताना समितीचे कार्य, समितीचे ध्येय, धोरण, उद्दिष्ट्ये, समाजातील आजचे भडसावणारे अनेक प्रश्न, समितीचे संघटनात्मक कार्य, संघटना बांधणी, जिल्हा, शहर, व सर्व तालुक्यांची कार्यकारिणी बांधणी, आणि माहिती अधिकार याचा वापर कश्याप्रकारे केला पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती दिली. आणि जिल्हाध्यक्ष मा. कोलुगुरी सरांनी समाजातील महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, अपराध, शोषण व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आपण समितीच्या माध्यमातून एकत्रित येऊन एकोप्याने काम करू. या समितीच्या माध्यमातून कामे करताना कायद्याचा उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आपल्या जिल्हाचा नाव महाराष्ट्राच्या समितीमध्ये कसा अग्रेसर होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. असे भावनिक आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले. यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. शिल्पा बनपुरकर, चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा. राजेन्द्र मेश्राम, जिल्हा महिला मार्गदर्शक कु. जास्मिन शेख, महिला संघटक कु. प्रगती पडगेलवार, जिल्हा संपर्क प्रमुख सौ. सरिता मालू, समन्वयक सौ. नेत्रा इंदुलकर, सचिव सौ. कौसर खान, सरचिटणीस सौ. अल्का मेश्राम, संगीता कार्लेकर, सौ. नितांत नागोसे, नवनियुक्त जिल्हा संगठक मा. राजेश बारसागडे, सिंदेवाही तालुका उपाध्यक्ष मा. अरुण माधेशवार, व सचिव मा. सुनील गेडाम, सावली तालुका उपाध्यक्ष मा. राकेश घोटेकार, व सावली तालुका सचिव मा. टिकाराम पि. म्हशाखेत्री, हे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक सुनील गेडाम, सूत्रसंचालन सौ. आरती आगलावे, आभार प्रदर्शन अरुण माधेशवार यांनी केले. सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.



