डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान
विहिरीसाठी फार्म भरण्याचे आव्हान
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत २०२०-२१ या सत्राकरीता नवीन सिंचन विहीर पॅकेज, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंम्पसंच, वीज जोडणी आकार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच इत्यादी बाबी विहित अनुदान मर्यादेत १००% अनुदानावर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेतून मिळणारा लाभ
या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्यासाठी नवीन सिंचन विहीर खोडण्याकरिता २:५० लाखापर्यन्त अनुदान देण्यात येईल,तसेच विहिरीवर विद्युत पंम्प बसविणे,वीज जोडणी देण्यात येईल या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढवण्यात मदत होईल.
नवीन विहीर घेणाऱ्या लाभार्थ्यांना विहीरीसाठी रु.२,५००००/- वीज जोडणी आकार रु.१०,०००/- विद्युत पंम्पसंच साठी रु.२५,००० असे एकूण रु.२,८५,००० चे पॅकेज तसेच जुनी विहीर दुरुस्ती रु.५०,०००- इनवेल बोअरिंग रु.२०,०००/-शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकर करण्यासाठी रू.१,००,००० एवढ्या रकमेचे पॅकेज अनुदान लाभार्थीच्या गरजेनुसार देण्यात येईल..
लाभार्थी पात्रतेच्या अटी
सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी अनुसूचित जाती व जमाती जात प्रमाणपत्र,स्वतःचे नावे किमान !०.४० हेक्टर व कमाल ६.०० हेक्टर शेतजमीन स्वतःचे नवे ७/१२ व नमुना ८ उतारा असणे,आधार कार्ड,स्वतःचे बँक पासबुक आधार कार्डशी संलग्नित असणे,दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीस प्रथम प्राधान्य,दारिद्र्य रेषेखालील नसल्यास शेतकऱ्यांचे सर्व मागणी मिळून उत्पन्न रु.१,५०,००० पेक्षा जास्त नसेल तर या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील.
लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी www.agriwell.mahaonline.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि कृषी विभागाच्या विविध योजनाकरिता महा DBT चे संकेतस्थळ mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा अधिक माहितीसाठी पंचायत समिती मधील कृषी विभागाशी संपर्क साधावा असे श्री.एस.एस. किरवे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी केलेले आहे



