भिमणी येथे विर बाबूराव शेडमाके शहीद दिवस साजरा.
भिमणी येथील आदीवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थीती
विदर्भ24 न्युज प्रतिनिधी भिमणी- ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात भारतीय स्वातंञ्याची ठिनगी उडविनारे महान योद्धा, ब्रिटीश साम्राज्याच्या विरुद्ध अत्याचाराने ञस्त असलेल्या शोषीतांना देशाच्या कानाकोपऱ्यातुन आवाज उठवायला प्रेरीत करणारे, विर योध्दा बाबुराव शेडमाके यांच्या १६२ व्या शहीद दिनानिमित्त पोंभूर्णा तालुक्यातील मौजा भिमणी येथे जागतीक गोंड सगा मादी शाखा तसेच रानी हिराई महीला बचत गटाच्या चे वतीने दिनांक २१ – १०- २०२० रोजी बुधवारला सायंकाळी ७ वाजता क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत श्रध्दांजली वाहून शहीद दिवस साजरा करण्यात आला, तसेच सल्ला शक्तीचे पुजन करन्यात आले यावेळी अशोक कोडापे (अध्यक्ष ) संतोष गेडाम (सचीव ) विनोद आञाम (उपसरपंच ) बंडुजी चाहाकाटे (भुमक ) दादाजी गेडाम, जैराम उईके, पांडुरंग चाहाकाटे, शालीक आञाम, अंबादास कोवे, सुरेश सोयाम, कारुजी सोयाम, बळवंत शेडमाके, मन्सराम गेडाम, लतेश मडावी, रामप्रसाद कुळमेथे, कार्तिक आळे, जिवन मडावी, तसेच मातृशक्ती – संगीता चाहाकाटे, मिराबाई आञाम, कमलाबाई उईके, जोती मंगाम, गंगुबाई आळे, सह समस्त गोंड सगा मादी भिमणी येथील समाज बांधव उपस्थित होते.



