वणी येथे आय .पी .एल. क्रिकेट बेटिंग जुगारांवर डीबी पथकाची धाड़
. एकूण ९,७०,७०० रूपयाचे मुद्देमाल जप्त
वणी – दिनांक १८ /१० /२०२० रोजी वणी शहर व परिसरात वणी पोलिस स्टेशनचे डी.बी.पथकासह क्रिकेट बेटिंग जुगार रेड संबधाने पेट्रोलिंग करीत असताना खबर मिळाली की, काही सम पिंजरा सूतगिरणीचे मागे ग्राम शिरगिरि चे शिवारात सार्वजनिक ठिकाणी बसून आयपीएल सन २०२० सीजन -१३ मध्ये सुरु असलेल्या टी ट्२० क्रिकेट मालिकेमधील कोलकत्ता नाईट रायडर क्रिकेट टीम विरुद्ध सन रायझर हैदराबाद क्रिकेट टीम मध्ये दिनांक १८ / १०/२०२० रोजी सुरू असलेल्या सामन्यावर मोबाईल द्वारे क्रिकेट बेटिंग हा जुगार हे खेळत व खेळवीत आहे. अशा खबरी भरून रेड चे योग्य नियोजन करून ग्राम शीरगिरी शिवारात आयपीएल क्रिकेट बेटिंग जुगारावर रेड केला असता, क्रेटा वाहन क्र एम. एच २९ बि.सी.४६२३ मध्ये बसून आरोपी नामे १) सय्यद मिनाज सय्यद मुमताज वय ३१ वर्षे रा. शारदा सॉ मिल जवळ शास्त्रीनगर वणी २) जमशेद हुसेन राशिद हुसेन वय २३ वर्षे रा. हमीद चौक जवळ मोमीनपुरा वणी ३) मंगल विठ्ठलराव खाडे वय ३२ वर्षे रा. शास्त्रीनगर वणी ह. मु. मंगलम पार्क आर. के अपार्टमेंट 2 चिखलगाव वणी मोबाईल द्वारे लोकांना कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट टीम विरुद्ध सनरायझर हैदराबाद क्रिकेट टीम मध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मॅच ओव्हर सेशन आणि मॅच चे हार- जीत वर रेट सांगून पैशाचा हार जीतचा जुगाराचा खेळ खेळताना व खेळविताना मिळून आले . त्याचे जवळून १) आठ मोबाईल हँडसेट कि.अ.६९००० /- २) क्रेटा वाहन एम. एच २९बि.सी.४६२३ कि. अ. ९००००००/- ३) ०५ डॉट पेन , एक कॅल्सी , स्टेपलर, पेड एकूण कि. अ. ४५०/- ४) ६ लेन-देण ची आकडे लिहिलेले कागद कि.अ. ००/०० /- ५) नगदी १२५० /- असा एकूण ९,७०, ७००/-मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपी हे कोरोनाआजाराचा संसर्ग असताना सुद्धा विना मास्क जवळ-जवळ बसून क्रिकेट बेटिंगचा पैशाचे बाजी लावून हार- जीत चा जुगाराचा खेळ खेळताना खेळविताना मिळून आले . त्याचे कृत्य कलम २६९ ,१८८ भा. द. वि. कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे होत असल्याने गुन्हा नोंद करून कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा. संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ.वणी, यांचे मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव , डी.बी. पथकाचे पोउपनि / गोपाल जाधव, पोहवा/ सुदर्शन वानोळे, पोना/ सुनील खंडागळे , सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पोकॉ / पंकज उंबरकर, पोकॉ / दीपक वांड्र्स्वार त्यांनी केली.



