Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथील ग्रामीण विज कर्मचाऱ्यांचा सन्मान कधी होणार ? त्यांनाही कोरोना योद्धाच्या घोषणा का नाही?

कोरोनाच्या संकट काळात वणी येथील महावितरणचे ग्रामीण विज कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन लोकांच्या आरोग्यासाठी ,स्वतःच्या जीवाची व स्व- कुटुंबाची पर्वा न करता जीव मुुठीत ठेवूूून करताहेत कार्य. राजुर वासीयांकडून  त्यांच्या कार्याला सलाम !

 

वणी – ग्रामीण भागात नेहमी विजेच्या गजबजाटात होत असते.  विज गायब झाली की, गदारोळ माजला जातो.विज गायब कशी झाली ?जबाबदार कोण ?विज कर्मचारी तर बिनकामाचे.ते काय काम करतात ? ग्रामीण येथील एकही कर्मचारी धडाचा नाही. सगळे उद्धट म्हणून आपण लाखोली वाहिले जाते .पण वणी येथील महावितरणचे ग्रामीण कर्मचारी आज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून रात्रंदिवस झटत आहेत व रात्रों बेरात्री परिवाराला सोडून ते आपल्यासाठी जीवाची रान करतात .त्यांच्या चांगल्या कामाकडे आपण नकळतपणे दुर्लक्षच करत आलो आहोत.आताही तेच करत आहोत.

देशात सध्या संकटांची राळच चालू आहे.एक संकट संपत नाही तोवर दुसरे संकट ‘आ’ वासून उभे राहत आहे. ग्रामीण भागात यापेक्षा भिन्न परिस्थिती नाही. ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेतली असता

राजुर मुख्यालय अंतर्गत येणारी गावे सोमनाळा, निंबाळा, भांदेवाडा, बोदाड,राजुर इजारा ई.गावात राजुर येथील वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप केळकर व त्यांचे सहकारी रुपेश आत्राम  कर्मचारी हे दोघे मिळून हे दोघे मिळून सात गावाची वसुली व त्याचबरोबर सात गावाचा सांभाळ , प्रति समस्याचे निराकरण करताना दिसत आहे.सात महि- न्यापासून प्रत्येक गावकरी ह्यांचे अहोरात्र मेहनत पाहतांना दिसत आहे.  मग पावसाळ्यात धोधो कोसळणारा पाऊस,विजा,वादळ येऊन धडकले.ते जात नाही तोवर  परतीच्या पावसाने  धुमाकूळ घातला. या अशा प्रसंगात जनसामान्यांच्या कोणता जीवाळ्याचा प्रश्न असेल तर तो म्हणजे वीज.

कोरोना संकट काळात लॉकडाऊन झाले. सगळे कर्मचारी घरी बसून वर्क फ्रॉम होम करत आहे . पण  वणी येथील महावितरणचे  ग्रामीण कर्मचारी मात्र प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहे . लोकांच्या विजेच्या संदर्भातील समस्या सोडवण्याचे काम करत आहे. विजपुरवठा अखंड पुरवण्यासाठी झटत आहे . लोकांच्या संपर्कात येत आहे. पण जसा गौरव डॉक्टर, आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांचा ‘कोरोना योद्धे’ म्हणून झाला तसा दिवसरात्र सेवा देणाऱ्या विजकर्मचाऱ्यांना कोणी ‘कोरोना योद्धा’ म्हणल्याचे स्मरत नाही.

विजकर्मचाऱ्यांनी ज्या तन्मयतेने ते काम सुरळीत  करतात. लोकांच्या घरातील अंधार दुर करतात, त्या कर्मचाऱ्यांचा सन्मान आजतागायत कोणी केल्याचे स्मरत नाही.उलट त्यांना घरि बसून शिव्या देताना दिसून येते.

पावसाळ्यात आणि आता परतीच्या पावसाने  धुमाकूळ घातला आहे. हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला आहे.विजव्यवस्था तर कधीच कोलमडून पडली होती. पण  ग्रामीण विज कर्मचाऱ्यांनी हार न मानता विजपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत केली. व प्रत्येकाच्या घरात प्रकाश तेवत ठेवला.

कित्येकदा विजेची कामे करत असताना दुर्दैवी घटना घडत असतात. कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. पण व्हिडीओ पाहून ( तो ही सोशल मीडियावर आलेला) फक्त हळहळ व्यक्त करण्याखेरीज आपण काय करतो?मग या कर्मचाऱ्यांचा गौरव ,सन्मान का होऊ नये?

विजबीले कळीचा मुद्दा-विज वितरण कंपण्या अव्वाच्या सव्वा बिले आकारत असतात.त्यात कर्मचाऱ्यांचा कितपत सहभाग असतो हे संशयास्पद आहे. पण त्या बिले आकारण्यावरुन ग्राहकाच्या रोषाला मात्र ग्रामीण  विज कर्मचाऱ्यांना जावे लागते. या बिलांमुळे लोकांचा कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.पण ग्रामीण विज  कर्मचाऱ्यांना समजून कोणी घेत नाही. त्यांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.

कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा-कुठल्याही क्षेत्रातील कर्मचारी असे उद्धटपणे वागतात. पण त्याचे प्रमाण नगण्य अथवा अपवादात्मक असते. म्हणून त्यांच्या अशा वागण्याचा परिणाम प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर होऊ नये .राजुर गावात ज्या प्रकारे ग्रामीण विज कर्मचारी संदीप , अहोरात्र कार्य करतांना दिसत आहे .त्यांची आज राजुर गावात स्तुतिमय कौतुक होताना सुद्धा दिसून येत आहे.

अशा संकटसमयी जीवतोड मेहनत करून लोकांच्या घरात अंधार सारून प्रकाश पोहचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान व्हावा .एवढीच माफक अपेक्षा गावकरी करीत आहे.

सर्व राजुर वासीयांकडून  ग्रामीण विज कर्मचारी संदीप खेमेकर व सहकारी रुपेश आत्राम त्यांच्या कार्याला सलाम!

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!