गडचिरोली-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट बांधकामाची तात्काळ चौकशी करा
बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची उलगुलान संघटनेची मागणी
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
मुल:- गडचिरोली ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वर रस्त्याचे बांधकाम सुरू असून. सदर रस्ता सिमेंट काँक्रीटचा बांधल्या जात आहे रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट पद्धतीने बांधल्या जात असल्यामुळे. सदर रस्त्याच्या बांधकामाचे उलगुलान संघटना द्वारा पाहणी केली असता यामध्ये अत्यंत निकृष्ट व खराब साहित्य वापरून बांधकाम केल्याचे आढळून आले. त्यामुळे रस्ता बांधकामाच्या सुरुवातीलाच रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरील गीट्टी वर आलेली असून बांधकाम करत असताना यामध्ये निकृष्टपणा व भ्रष्टाचार झाल्याचे आढळून येत आहे.

रस्त्याचे बांधकाम चालू
असतानाच रोड अत्यंत खराब होत असून रस्त्यावरील खड्डे सुरुवातीलाच दिसत आहेत.ही बाब अतिशय गंभीर असून यामध्ये ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे असे दिसून येते.सदर बांधकामाची तात्काळ चौकशी करून बांधकाम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी करिता उलगुलान संघटनेद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मुल यांचेमार्फत निवेदन देण्यात आले. जर संबंधित महामार्गाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई केली नाही तर उलगुलान संघटना संबंधित महामार्गाचे काम बंद करून रास्ता रोको आंदोलन करन्याचा इशारा निवेदनामार्फत देण्यात आले आहे . निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे जिल्हा संयोजक प्रशांत उराडे, मुल शाखा अध्यक्ष निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, साहिल मेश्राम, वतन चिकाटे, कुंदन कस्तुरे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



