मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षण कायम ठेवून बदली व पदोन्नती पदस्थापना करा
कास्ट्राईब संघटनेची मागणी..
विदर्भ 24न्यूज
जिल्ह्या प्रतिनिधी/गडचिरोली :- १५आक्टोबर रोजी कास्ट्राईब वन कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोली यांनी मा. मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांना मागण्याचे निवेदन देवून कर्मचारी यांचे प्रलंबित मागन्याचे संदर्भात त्यांचे दालनात झालेल्या सभेमध्ये सविस्तर चर्चा करून मुद्दे मांडण्यात आले.
कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष राजकुमार घोडेस्वार यांचे नेतृत्वात सर्व प्रथम संघटनेचे वतीने त्यांचा शाल व पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर चर्चेला येणाऱ्या अडचणी नुसार सेवापुस्तक अद्यावत करणे, अग्निरक्षकांचे प्रलंबित वेतन, महिलांचे प्रसाधन गृह,वन नाका अद्यावत करणे, वनरक्षक व वन पालांचे वेतन निश्चिती मध्ये तफावत,वनपालाना कार्यालय व मदतनीस, विभागीय व सर्कल स्तरावरील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळणे, आश्र्वासित प्रगती योजनेत सुधारणा, घरबांधणी दंड थांबविणे , पदोन्नती करणे, कोवीड मुळे विमा काढणे व सरक्षण मिळणे , पूर्वीचे उत्तर व दक्षिण चंद्रपूर येथील बिंदू नामावली नुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षण कायम ठेवून बदली व पदोन्नती ची पदस्थापना करण्यात यावे. अश्या विविध मागण्या विषयी सांगोपांग चर्चा करून सभा पार पाडण्यात आले, यामध्ये मुख्य वनसंरक्षक आयएफएस गडचिरोली प्रवीण कुमार, यांनी सर्व अडचणी बाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविले. सभेमध्ये मा. डॉ. कुमारस्वामी आयएफएस उप. वनसंरक्षक गडचिरोली व घंटावार मुख्य लेखापाल हे हजर होते, तर संघटने तर्फे नामदेव बंसोड कार्याध्यक्ष, रमेश घुटके उपाध्यक्ष, सिध्दार्थ गोवर्धन महा सचिव, प्रसिध्दी प्रमुख विनोद धत्रक गडचिरोली विभागाचे अध्यक्ष सुनील देठे, सचिव धम्मराव दुरगमवर,रुपेश मेश्राम , शब्बीर शेख,वडासा चे अध्यक्ष संदीप शेंडे, संघटक के. बी. ढवळे,आलापल्लीचे भारत नीमगडे हे पदाधिकारी हजर होते. सभेमध्ये गडचिरोली वनविभागातील सेवापुस्तकाचे काम पूर्ण झाल्याने. डॉ. कुमारस्वामी आयएफएस उप वनसंरक्षक यांचे स्वागत करण्यात आले. सभेचे संचालन व आभार धम्माराव दुर्गमवार सचिव यांनी मानले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343



