मुख्य रोड वरती बिल्डींग मटेरियल टाकुन प्रदुषण परीसरातील नागरिक ञस्त ! व्यापारी मालामाल ? प्रशासन सुस्त !
वणी – वणी ते यवतमाळ रोड हा शहरातील मुख्य वर्दळीचा रोड असुन ,त्या रोडनी लोकांना वाहतुकीसाठी ञास होऊ नये व शहराची शोभा वाढावी ,या करीता शासनाने करोडो रूपये खर्चून हा मुख्य रोड चिखलगाव ते वरोरा नाका पर्यंत बनविला व वाढीव रूप देऊन हा मुख्य रोड मोठे पण केले त्यामुळे नागरिकांना प्रदूषणनाचा ञास कमी होऊन , परीसर स्वच्छ राहावे ,हाच हेतु होता .परंतु हा हेतू साध्य न होता लोकाना वेगळाच ञास वाढला आहे. या विषयी सविस्तर माहिती असे कि ,साई मंदिर ते चिखलगाव नाका या पर्यंत अनेक व्यावसायिकानी आपली दुकाने रस्त्यावर थाटली असुन, मुख्य रोड चिचोडा झाला आहे. तर काही बिल्डिंग मटेरियल व्यावसायिकांनी तर मुख्य रोडड वरती बिल्डींग मटेरियल विक्री करीता मुख्य रोड वरती टाकुन सरासर विक्री सुरू केली. दररोज या बारीक चुरीची खेप ट्रक द्वारे टाकली जात असुन रोड वरील हि चुरी चिल्लर विक्रेते तिथून ऊपसा करून बिल्डींग मटेरियल करीता ,विक्री करून नेत असतानाचे चित्र दिसून येत आहे .हा क्रम अनेक दिवसांपासून सुरू असुन काहीनी परीसरातील प्रदुषणा बाबत समज पण दिली परतू काहिच साध्य झाले नाही . ईथे दररोज मोठ्या ट्रक द्वारे बारीक गीट्टीची भुकटी टाकली जाते .हे नित्य नियमीत सुरू असुन या पासुन येथील नागरीकांना नाहाक ञास वाढत असुन ,दुकान व घरामध्ये बारीक भुकटी पासुन प्रदुषण वाढत आहे. वणी येथील नागरीक ञस्त झाले आहे. हे व्यवसायिक शासकिय रोड च्या जमिनीवर बारीक भुकटी संग्रहित करून मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहे. मोठ्या वाहनाने या रोड वरती हि बारीक गीट्टीची भुकटी टाकत असताना वाहतूक पण प्रभावी होत आहे. तरी नागरिकाचा विचार करून प्रशासनाने रोड वरील बिल्डींग मटेरियल वरती कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकाची आहे तसेच ‘निरी’ चा अहवाल गुडाळला गेला.प्रदुषण नियामक मंडळ नागपूर येथील एका खाजगी संस्था ‘निरी’ यास वणी शहरात प्रदुषण बाबद अहवाल ऐकञ करून तो अहवाल सादर करण्याची विनंती केली होती .ज्यामुळे प्रदुषण कमी होईल .या अहवालात साई मंदिर ते लालपुलीया पर्यंतचा परीसर ‘अ’ ग्रेड मध्ये मोडत असुन सर्वात जास्त प्रदुषण शेञ म्हणून घोषित केला होता .त्यामुळेच या रोडला प्रदुषण पासुन मुक्ती साठी करोडो खर्चुन मोठे केले . परंतु हा रोड मोठा होताच काही व्यवसायिकांनी दुकानाचे बिल्डींग मटेरियल रोड वरती टाकून सर्रास प्रदुषणाचा फज्जाच उडविला आहे .असे चित्र दिसून येत आहे.



