समतादूतच्या वतीने झूम एप द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
समतादूतच्या वतीने झूम एप द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली:- डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे जिल्हा गडचिरोली च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू म्हणून जन्मास आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही असे म्हटले होते तसेच नाशिक च्या येवले या ठिकाणी १९३५ ला धर्मांतराची घोषणा केली होती व विविध धर्माचा अभ्यास करून १४ ऑक्टोबर १९५६ ला दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला व भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले तेव्हापासून हा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सध्या देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना ने थैमान घातल्याने व प्रार्थना स्थळे बंद असल्यामुळे हा धम्मचक्र प्रवर्तन दिन समतादूत यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने झूम अँप च्या मदतीने घेण्यात आले. भन्ते डॉ. धम्मसेवक महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व उपस्थिती साजरा करण्यात आला, कार्यक्रम संचालन व प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांनी केले व उपस्थित बांधवांचे आभार वंदना धोंगडे समतादूत यांनी मानले. कार्यक्रमात परिसरातील धम्म बांधव तसेच जिल्ह्यातील समतादूत होमराज कवडो,जयलाल सिंदराम उपस्थित होते..
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343



