मुल येथील रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व रुग्णांकरिता आवश्यक सोय करण्याची मागणी
-मुल तहसीलदारांना उलगुलान संघटनेचे निवेदन
विदर्भ 24न्यूज
जिल्ह्या प्रतिनिधी/मुल:- सध्या कोरोना महामारीचे संकट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असून, याच धर्तीवर तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये व त्यांना योग्य उपचार मिळावा करिता कोरोना रुग्णालय तयार करून कमीत कमी २० ऑक्सिजन बेडची व्यवस्था रुग्णालयात करण्यात यावी. तसेच रुग्णालयात रुग्णाच्या इतर सोयीकरिता पुरेसा स्टॉप नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहे. साधा ताप, रक्तदाब वाढल्यास कोणताही उपचार न करता सरळ सरळ चंद्रपूरला पाठविल्या जाते.आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे डॉक्टर व इतर स्टॉप ची भरती तात्काळ करण्यात यावी. रुग्णालयात पुरेसा औषधसाठा व आरोग्याच्या दृष्टीने इतर सुविधा करण्यात याव्या या मागणीला घेऊन उलगुलान संघटनेद्वारे तहसीलदार मूल यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर वरील संपूर्ण मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा उलगुलान संघटना आक्रमक पवित्रा घेणार व या विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा उलगुलान संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला. निवेदन देताना उलगुलान संघटना शाखा मुल चे अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, शुभम दहिवले, साहिल खोब्रागडे, कुंदन कस्तुरे,चेतन दहिवले, शुभम उराडे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी व जाहिरासाठी संपर्क साधा-9422645343



