Vidarbh24News

Latest Online Breaking News

*आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी त्‍वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार* *लवकरच आठवडी बाजार सुरू होतील – मदतकार्य व पुनर्वसन विभागाच्‍या सचिवांचे आश्‍वासन*ई

*आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी त्‍वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार*

*लवकरच आठवडी बाजार सुरू होतील – मदतकार्य व पुनर्वसन विभागाच्‍या सचिवांचे आश्‍वासन*

राज्‍यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्‍यानंतर लागु करण्‍यात आलेल्‍या लॉकडाउन पासुन आठवडी बाजार बंद करण्‍यात आले आहेत. राज्‍यात टप्‍याटप्‍याने अनलॉक सुरू झाल्‍यानंतर अद्याप आठवडी बाजार मात्र सुरू करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे आठवडी बाजारावर ज्‍यांचा उदरनिर्वाह‍ अवलंबुन आहे अशा छोटया – मोठया व्‍यावसायीकांचा व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. ही बाब लक्षात घेता त्‍वरीत आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्‍यांनी मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्‍याशी चर्चा केली असुन लवकरच आठवडी बाजार सुरू करण्‍यात येतील असे आश्‍वासन श्री. निबांळकर यांनी आ. मुनगंटीवार यांना दिलेले आहे.

राज्‍यात टप्‍याटप्‍याने अनलॉक सुरू झाल्‍यानंतर हॉटेल्‍स, मॉल्‍स, मदीरालये आदींना परवानगी देण्‍यात आली आहे. परंतु ग्रामीण तसेच निमशहरी भागातील नागरिकांसाठी अतिशय जिव्‍हाळयाचा समजला जाणारा आठवडी बाजार मात्र अद्याप सुरू झालेला नाही. 6 महिन्‍यांचा कालावधी लोटुनही अद्याप आठवडी बाजार बंद असल्‍यामुळे यावर अवलंबुन असलेल्‍या व्‍यावसायीकांना व्‍यवसायाअभावी आर्थीक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. त्‍याचप्रमाणे नागरिकांना सुध्‍दा गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता आठवडी बाजार सुरू करण्‍याबाबत त्‍वरीत निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!