खरकाडा येथील मृतकांच्या कुटुंबियांना नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत.
ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा खरकाडा येथील दोन युवकांचा दिनांक 9/10/2020 ला अपघाती मृत्यू झाला अपघातग्रस्त युवक प्रशांत मुरलीधर सहारे वय 22 वर्ष,रोहित अशोक चट्टे वय 22 वर्ष यांना पहाटेच्या सुमारास रस्त्यालगत व्यायाम करीत असताना अज्ञात वाहनाने चिरडले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला याची माहिती आमदार तथा कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना मिळताच त्यानी आज दिनांक 12/10/2020 ला खरकाडा येथे अपघातग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि आर्थिक मदत केली तसेच ब्रम्हपुरीचे तहसीलदार विजय पवार यांना भ्रमणध्वनी करून मृतकाचे कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत मिळन्याकरीता तातडीने प्रस्ताव तयार करून पाठवावा असे निर्देश दिले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर,काँग्रेस चे जेस्ट नेते नानाजी तुपट,जी प सदस्य प्रमोद चिमुरकर,माजी सरपंच खरकाडा रवींद्र ढोरे तथा गावातील नागरिक उपस्थित होते.



