पोलीस बॉईज असोसिएशन मुंबई प्रदेश संघटक पदी संजय डे यांची नियुक्ती
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले जाहीर
विदर्भ 24न्यूज/
मुंबई : – १० ऑक्टोबर रोजी मुंबई येथील रहिवासी असलेले संजय दीपक डे यांची पोलीस बॉईज असोसिएशन मुंबई प्रदेश संघटक पदी नियुक्ती केल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जाहीर केले.संजय डे सन २०१८ पासून पोलीस बॉईज असोसिएशन मध्ये सहभागी आहेत, त्यांनी मुंबई उपाध्यक्ष सय्यदराजा मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन मध्ये चांगल्या पद्धतीने काम केले असून असोसिएशनच्या प्रत्येक आंदोलणात त्यांचा सहभाग होता.पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शैलेश पांडव व मुंबई उपाध्यक्ष सय्यदराजा मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे काल झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे, त्यांच्या या निवडीबद्दल मुंबई पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.




