मायावृक्ष प्रतिष्ठान आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट च्या वतीने बाबापूर येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
वणी – उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला ओळखले जाते, आज कोरोना या महामारीत सगळं जग ठप्प पडलेला असतांना संपूर्ण जगाला पोसण्याचं काम कृषी व शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आज आधुनिक जगात सर्वांची प्रगती झाली परंतु शेतकरी मात्र तिथेच राहिला अश्या गावखेड्यातील शेतकऱ्यांना आधुनिक जगाशी जोडण्याकरिता व आधुनिक शेती समजवून सांगण्याकरिता मायावृक्ष प्रतिष्ठान आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट च्या वतीने बाबापूर येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रा.स.मु.ट्रस्ट च्या वतीने श्री अतुल पिदूरकर, क्षेत्र समन्वयक सचिन बोधे, कृषीमित्र गणेश आणि शंकर ,त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठान च्या उपाध्यक्षा माधुरी तुरानकर उपस्थित होत्या.
यावेळी गावकऱ्यांच्या शेतावर जाऊन कापूस पिकाची पाहणी करून त्यांना Better Cotton Standerd System ह्या प्रकल्पाविषयी देखील माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली.व अश्या प्रकारची कार्यशाळा आयोजन केल्या बद्दल प्रतिष्ठान व मार्गदर्शकांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन मायावृक्ष प्रतिष्ठान च्या समूहाने केले.



