बार्टी तर्फे अट्रोसिटी ऍक्ट कायद्यावर झूम अँप च्या माध्यमातून मार्गदर्शन
बार्टी तर्फे अट्रोसिटी ऍक्ट कायद्यावर झूम अँप च्या माध्यमातून मार्गदर्शन
विदर्भ 24न्यूज
जिल्ह्या प्रतिनिधी/
गडचिरोली:-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे जिल्हा कार्यालय गडचिरोली च्या वतीने झूम अँप च्या माध्यमातून अट्रोसिटी ऍक्ट १९८९ विषयी कार्यक्रम घेण्यात आले. बार्टीच्या समतादूत मार्फत भारतीय संविधान, अंधश्रद्धा निर्मूलन, समता प्रबोधन केले जाते,तसेच महापुरुष जयंती पुण्यतिथी निमित्य सुद्धा कार्यक्रम घेण्यात येतात. अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांना अट्रोसिटी ऍक्ट विषयी माहिती व्हावी या ऊदेशाने हा कार्यक्रम आयोजित केला या ऍड. श्रावण ताराम यांनी
अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तीला योग्य वा अयोग्य पदार्थ खाण्याची व पिण्याची सक्ती करणे.जातीय भावनेतून शारीरिक इजा करणे, त्रास देणे, अपमान करणे.नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा करणे.जमिनीचा गैरप्रकारे उपभोग घेणे.
स्वतच्या मालकीच्या जमीन व पाणीवापरात अडथळा निर्माण करणे.वेठबिगारी करण्यास सक्ती करणे. धाक दाखवून मतदान करण्यास भाग पाडणे.
अनुसूचित जाती व जमातींच्या व्यक्तीच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे.
लोकसेवकास खोटी माहिती पुरविणे.
सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे.
प्रार्थनास्थळे, नदी, विहिरी, पाणवठे अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे.
प्रार्थनास्थळास अथवा घरास आग लावणे.
पिण्याचे पाणी दूषित किंवा घाण करणे.
महिलांचा विनयभंग करणे.
महिलांचा लैंगिक छळ करणे.
पुरावा नाहीसा करणे.
लोकसेवकाने कोणताही अपराध करणे.
या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकार व पोलिसांची आहे. त्यासाठी पुढील गोष्टी त्यांनी करणे अनिवार्य ठरवले गेले आहे.
यावर सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन वंदना धोंगडे समतादूत यांनी केले तसेच प्रस्तावित प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांनी केले मान्यवरांचे व उपस्थित नागरिक यांचे आभार जयलाल सिंदराम यांनी केले.
कार्यक्रमात विशेष उपस्थिती पोलीस कर्मचारी ,वकील प्रतिनिधी, समतादूत ,मुख्यलयीन प्रकल्प अधिकारी शिल्पा शिवणकर, मॅडम , व जिल्ह्यातील काही नागरिक उपस्थित होते.



