राजुर गावासाठी 50 कचरा कुंडी व घंटा गाड़ी उपलब्ध करुण द्या.
वणी – तालुक्यातील राजूर ह्या गावाची खरंतर मिनी इंडिया म्हणून ओळख आहे. मात्र याच राजुर कॉलरीच्या चेहरा गेल्या काही दिवसांपासून विद्रूप होत चाललेला आहे. मागील दहा दिवसापासून तब्बल एक टन कचरा कुंडीच्या बाहेर रस्त्यावर साचुन असलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीत गाव म्हणून ओळखला जात आहे बाजार वाडी पासून फक्त आणि फक्त कचरा कुंडी तुटून फुटून दिसून येत आहे .
या गावची दयनीय अवस्था होत आहे व आरोग्याला धोकादायक होत आहे व यामुळे लोकांचचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच काही ठिकाणी कुंडी फुटलेली आहे . म्हणून कायमस्वरूपी घण्टा गाडीची व्यवस्था करुन द्यावी . गावात मोठ्या कचरा कुंड्यांची व्यवस्था सुद्धा नाही, म्हणून नागरिकांची दुर्दैवी अवस्था झाली आहे. नेमका कचरा कुठे टाकायचा ? हा सुद्धा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झाला आहे राजुर गाँव तालुक्यात सर्वात मोठा गाँव म्हणून म्हटल्या जाते .इथे लहान साहन कचरा कुंडीची सुद्धा व्यवस्था नाही परन्तु गावची लोकसंख्या बघता येथे मोठ्या कचरा कुंडीची गरज आहे. संपूर्ण राजुर गावात कुंडी ची गरज आहे 
जबाबदार किंवा संबधित अधिकाऱ्यांनी राजुर राजुर गावातिल प्रत्येक वॉर्ड व रस्त्यात मोठ्या कचरा कुंडी ची व्यवस्था करून द्यावी. मोठ्या कचरा कुंडीची साइज जेम तेम 12 * 10 असली पाहिजे व त्याच बरोबर कायमस्वरूपी घण्टा गाडीची सोय उपलब्ध करुन त्यांना आरोग्याकड़े लक्ष द्यावे.कारण लोक संख्या बघता तेवढी कचरा कुंडी इथे नाही त्याकरता आपण इथे लवकरात लवकर कचरा कुंडी राजुर गावातील लोकांना सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. हि विनंती ग्रामपंचायतेला माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिति जिल्हाध्यक्ष अजय कंडेवार व गावातील समाजसेवीका आशा रामटेके यांनी निवेदन दिले.



