Vidarbh24News

Latest Online Breaking News

जातीनिहाय जनगणना करा, मराठ्यांचा ओबीसीत समावेशाला विरोध,  सावली तालुका कुणबी समाज संघटना तर्फे तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन

 

जातीनिहाय जनगणना करा, मराठ्यांचा ओबीसीत समावेशाला विरोध,  सावली तालुका कुणबी समाज संघटना तर्फे तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन

कवठी प्रतिनिधी

सध्या सर्वोच्च न्यायालय यांनी मराठा आरक्षणला दिनांक 9 सप्टेंबर 2020 ला स्थगीती दिली आहे. मात्र मराठा समाजातील नेते व संघटना मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवावी व आमचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी करीत आहे.
आमचा त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही परंतु मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गा मध्ये समावेश करू नये.
भारताची जनगणना करतांना जनगणना नमुना प्रपत्रामध्ये इतर मागास प्रवर्ग संवर्गाचा जातनिहाय स्वतंत्र रकाना निर्माण करून इतर मागास प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी.52% इतर मागास प्रवर्ग असतांना स्वतंत्र जनगणना प्रपत्रात रकाना नाही तरी स्वतंत्र रकाना निर्माण करण्यात यावा. इतर मागास प्रवर्गाची जनगणना करण्यात यावी.
2021 मध्ये होणारी जनगणना हि जाती निहाय करण्यात यावी. कि जेणे करून देशातील प्रत्येक जातीचे किती टक्केवारी आहे हे समजायला सोपे होईल. व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हातील आरक्षणाचे प्रमाण एक समान असावे अश्याप्रकारचे निवेदन कुणबी समाज संघटने तर्फे तहसीलदार सावली मार्फत मुख्यमंत्र्याना पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी उपस्थित असलेले कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री.अर्जुन बोंडकूजी भोयर ,कुणबी समाज संघटनेचे सचिव सौ.उषाताई राजेंद्र भोयर ,कोष्याध्यक्ष श्री.दीपक जवादे , उपाध्यक्ष श्री.अनिल मशाखेत्री, सदस्य श्री.किशोर  घोटेकार,भाऊजी कीनेकर ,सदाशिव बोबाटे ,कवींद्र रोहनकार ,पुनम झाडे,किशोर वाकुडकर ,नितीन गोहणे,मिथुन बाबनवाडे, धनराज डबले, गिरीधर काटवले , राजू धोटे , टीकाराम रोहनकार ,अरुण पाल , हिवराज शेरकी,दौलत भोपये,राजेंद्र भोयर ,गिरीश चिमुकर ,मनीषाताई जवादे , व अन्य समाज बांधव उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!