हाथरस प्रकरणातील,दोषी व्यक्ती ना,फाशी द्या,,अखिल भारतीय मादगी,समाज संघटनेची मागणी,
काल अखिल भारतीय मादगी समाज संघटना गोंडपिपरी तालुका तर्फे हाथरस घटनेचा निषेध करून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करणारे निवेदन सन्माननीय- महामहिम राष्ट्रपती यांना मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, गोंडपिपरी मार्फत निवेदन देण्यात आले. उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित- मागासवर्गीय भगिनींवर झालेल्या अत्याचार व अमानुषपणे खून प्रकरणी पिडीत तरुणीला न्याय मिळवून देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून देशामध्ये वेळोवेळी दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजावर नेहमी अमानुष व क्रूर स्वरूपात अन्याय – अत्याचार केला जात आहे.. व या संदर्भात देशपातळीवर अजिबात दखल घेतली जात नाही. किंबहुना असे प्रकरण सोईस्करपणे दाबली जात आहेत..अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढले पाहिजे…
यास्तव पीडित दलित – मागासवर्गीय तरुणीला न्याय मिळून निर्घृण व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आरोपींना देहदंडाची शिक्षा लवकरात लवकर देऊन न्याय व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा जेणेकरून अशी प्रकरणे पुन्हा पुन्हा होऊ नयेत..म्हणून कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले…निवेदन देताना मा. गोविंद कामरेवार, प्रदेश संघटक, मा. राजेश डोडीवार, विदर्भ अध्यक्ष तथा उपसरपंच ग्रामपंचायत कुडेसावली, मा. विश्तारी इंटकलवार, अध्यक्ष गोंडपिपरी तालुका, मा. शंकर पुल्लीवार उपस्थित होते.



