राजुर कॉलरी येथील निष्कृष्ट दर्जाच्या रस्त्याकड़े वेकोलि प्रशासनाच्या दुर्लक्षितपणा , रस्त्यात जीवघेणे खड्याचे काम अर्द्धवट व रात्रीचे पथदिवे अर्धे चालू व अर्धे बंद त्यामुळे घातापाताची शक्यता
वणी – तालुक्यातील राजुर गावातील राजुर फाटा पासून गावात जाणाऱ्या सर्व रस्त्यांना मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असून त्या खड्ड्यात माती किंवा मुरून टाकण्यात आले असूनही ते काम निकृष्ट दर्जाचा मुरुम टाकून डागडुगीचे कार्य करण्यात आले. एकाच पावसाने पूर्ण जैसे थे तो रस्ता झाला. मोठ्या मोठे खड्डे तयार झाले असून रात्रीचे पथदिवे अर्धे बन्द व अर्धे सुरु अवस्थेत आहे ,म्हणून रस्त्यात घातपात होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झालेली दिसून येत आहे.
सकाळी रस्त्यामुळे व रात्रीच्या वेळेला पथदिवेमुळे नागरीकांना रहदारी साठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मात्र राजुर कॉ येथील वेकोलीचा प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व येथील अधिकारी यांचा बेजबाबदारी पणामुळे नागरिकांना जीव धोक्यात टाकून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मात्र आजतागायत ते मोठे खड्डे भुजविन्यात आले नाही. ह्या राजुर वेकोलीच्या प्रशासनाला आताही यश आले नाही. यांचा मागील कारण नेमके कोण ? रस्त्या पूर्णपणे बनविन्यात नेमके कोण अडथळा टाकत आहे? फक्त डागडुगीचे काम करुन थातुरमातुर रस्ता बुजवून लोकांची दिशाभूल करण्याचे येथील अधिकारी व येथील ठेकेदार करत असताना मागील पूर्ण पावसाळ्यात दिसून आले . महत्वाचे म्हणजे ह्या मार्गावर सर्व मोठ्या प्रकारचे वाहने चालतात व wcl चे कर्मचारी तसेच अधिकारीवर्ग सुद्धा ह्याच मार्गाने रहदारी करीत असतात .तरीही येथील अधिकारी मात्र निद्रा अवस्थेत आहे.हे सर्व राजुर wcl येथील अधिकारी एखाद्या अपघात होण्याची वेळ बघत आहे का ? असा प्रश्न चिन्ह उभा झाला आहे
रस्त्यावर खड्डेच पडले आहेत, आभाळ नाही कोसळले ते बुजविण्यासाठी माती नको, टिकावू साहित्य वापरावे नाही तर पुन्हा पुन्हा मोठं मोठे तळे निर्माण होतील की काय असे गावातील नागरिकांनमध्ये सद्या चर्चा जोरात सुरू आहे.
गावातील सर्व रस्त्यांना मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहे.व रस्त्यात पथदिवे चालू अवस्थेत असले तरीही अर्धे बन्द व अर्धे सुरु आहे.महत्वाचे म्हणजे चेक पोस्ट वर सुद्धा पथदिवे बंद आहे . येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
.
राजुर ह्या गावची मिनी इंडिया म्हणून ओळख आहे, मात्र याच गावात येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था पाहुन अधिकारी कसे निद्रा अवस्थेत असु शकता ???? हा प्रश्न चिन्ह निर्माण होते. सद्या स्थितीत रहदारीत मोठे खड्डे फक्त मातीने डागडुगी नको तर चांगल्या दर्जाचा डांबर वापरून रस्ता तयार करायला पाहिजे असे गावकरी मधे चर्चा आहे. गावातील त्याच रस्त्यावरून भांडेवाड़ा माइन कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे. हे पाहुन प्रशासनाचे लक्ष नेमके कुठे आहे ? हे दिसून येते.
प्रशासनाचा भोंगड कार्याने गावात असमाधानकारक चित्र निर्माण झाले असले तरी,बहुतांश रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामुळे रस्त्यांचा आणि यंत्रणेच्या कामांचा दर्जाही चव्हाट्यावर आला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून, या खड्ड्यांमधून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर डांबरी रस्त्यांवर अर्धा ते एक फूट खोल खड्डे पडलेले असून, ते सहजासहजी निदर्शनास येत नसल्याने तेथे वाहने आदळत आहेत. त्यातूनच लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे
.
गुळगुळीत रस्त्यांवरून चाललेली वाहने असे स्वप्न राजुरवासियांना रोजच पडत आहे. परंतु, तूर्तास तरी नागरिकांना चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच वाहने दामटावी लागत असून, त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. खड्डेच खड्डे चोहीकडे अशी सध्या राजुर कॉ येथील बहुतांश रस्त्यांची स्थिती असून, या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. राजुर WCL येथील मोठ्या अधिकाऱ्यांनी याची यजबादारी घ्यावी. अन्यथा मोठी घटना घडेल की क़ाय येणारी वेळ सांगेल……म्हणजेच घटना होईपर्यन्त राजुर wcl प्रशासन जागा होईल की क़ाय??????



