॥ ऑनलाईन शाळा ॥… कवी- श्याम पेडणेकर
कवी- श्याम पेडणेकर
विदर्भ 24न्यूज/जिल्हा प्रतिनिधी
॥ ऑनलाईन शाळा ॥
पाठीवरचे ओझे गेले
घरातच भरते शाळा
माउस झाला खडू
अन् कम्प्युटरचा फळा..।
शाळा सुटली, पाटी फुटली
नाही घंटेची टन-टन
घंटेऐवजी क्लिक करा
ऑफलाईन बटन..।।
शिक्षणाच्या बुद्धीबळाचा
झालाय चेकमेट
जाळ्यात अडकला विद्यार्थी
घरातच विणलय नेट..।।।
– श्याम पेडणेकर, ठाणे शहर

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343




