पोलीस बॉईज असोसिएशन नांदेड जिल्हाध्यक्ष पदी शाम कदम यांची फेरनिवड
-पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले जाहीर
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी /नांदेड:- ०२सप्टेंबर रोजी पोलीस बॉईज असोसिएशन नांदेड जिल्हाध्यक्ष पदी शाम नागनाथराव कदम यांची फेरनिवड करण्यात आली असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जाहीर केले आहे. शाम कदम हे सन २०१६ पासून पोलीस बॉईज असोसिएशन मध्ये नांदेड जिल्हाध्यक्ष पदी काम करत आहेत, त्यांनी ४ वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने केली आहेत, निवेदने दिली आहेत, तसेच नांदेड जिल्ह्यातील पोलीसांच्या सुख – दुःखामध्ये त्यांचा सहभाग असतो, तेथील प्रत्येक पोलीसांच्या मदतीला ते असोसिएशन मार्फत धाऊन जातात , त्यामुळे त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता शाम कदम यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड केल्याचे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत, शाम कदम यांनी संभाजी ब्रिगेड नांदेड महानगर अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे , त्यामुळे त्यांच्या या फेर निवडीमुळे पक्षाच्या वतीने सुद्धा त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
शाम कदम यांच्या निवडीचे नांदेड जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत असून पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत




