यु.पी. मधील हाथरस बलात्कार व हत्याकांड निषेधार्थ बी.आर.एस.पी. गडचिरोली च्या वतीने मोदी-योगी अरथी आंदोलन
-जिल्हाधिकारी कार्यालया समोर नारे निदर्शने करून मोदी-योगी प्रेत यात्रा काढण्यात आली..
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली:- उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्काराच्या घटनेचा निषेधार्थ बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने आज जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. हाथरस येथे झालेल्या पीडित मुलीच्या हत्याकांड करणाऱ्याना आरोपीच्या विरोधात लवकरात लवकर कठोर सजा व्हावी या करिता निषेध करून अर्थी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, जिल्हाध्यक्ष राज बनसोड, जिल्हा महासचिव सदाशिव निमगडे, महिला सा. कार्यकर्त्या ऍड. सोनाली मेश्राम, सपना बांबोळे, सायली मेश्राम, विधानसभा प्रमुख पुरषोत्तम रामटेके,मिलिंद बांबोळे, प्रतीक डांगे,जितेंद्र बांबोळे, प्रफुल रायपुरे, संघरक्षित बांबोळे,हेमंत नैताम, किशोर नरुले,विवेक बारसिंगे,सतीश दुर्गमवार, मुन, आदी कार्यकर्ते उपस्तित होते.

बातमी व जाहिरातीकरिता संपर्क साधा-9422645343



