*पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अवैध दारु विक्री करणारी होंडा सिटी गाडी पकडली
अधिक माहिती नुसार आज पहाटेच्या 4 वाजताच्या दरम्यान पोलिसांनी गोंडपीपरी -मूल मार्गाने एक होंडा सिटी कार ने अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली,त्या माहिती ला गांभीर्याने घेऊन,पोलिसांनी संबंधित मार्गावरील चौकात गस्त लावली असता,सदर मार्गाच्या दिशेने एक होंडा सिटी कार जाताना आढळून आली,पोलिसांनी संशय व्यक्त करून,गाडीचा पाठलाग सुरू केला .हा प्रकार गाडी चालकाच्या लक्ष्यात येताच चालकाने गाडीचा वेग वाढविला आणि खरालपेठ गावा जवळील सुनसान जंगल परिसरात गाडी ठेऊन,अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले.पोलिसांनी पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता,7 पेटी ,सुपर सोनिक रॅकेट संत्रा देशी दारू असे लेबल असलेली,प्रत्येकी 100 मग,,असे 709 संत्रा देशी दारू,किंमत,70,000 हजार रुपये व होंडा सिटी कार क्रमांक,MH-34,C, P,-1539 जुनी वापरलेली किंमत,2 लाख पन्नास हजार रुपये अशी एकूण,,,3 लाख20 हजार रुपयांचा मुद्देमाल ,अवैधरित्या आढळून. अज्ञान फरारी आरोपी विरुध्द,65 मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही ठाणेदार संदीप,धोबे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस कर्मचारी, देवेश कटरे, प्रफुल्ल कांबळे, संतोष काकडे,विवेक,यांच्या नेतूत्वात करण्यात आली,असून,पुढील तपास सुरू आहे,,



