पोलीस बॉईज असोसिएशन जालना जिल्हाध्यक्ष पदी सचिन पांडुरंग राठोड यांची निवड
-पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केली कार्यकारिणी जाहीर
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ जालना :- येथील रहिवासी असलेले सिनियर पोलीस बॉईज सचिन पांडुरंग राठोड यांची दिनांक ३०सप्टेंबर रोजी पोलीस बॉईज असोसिएशनच्या जालना शाखा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून, सचिन राठोड हे पोलीस कुटुंबियांच्या कोणत्याही अडचणीला धाऊन जातात, तसेच पोलीस पाल्यांच्या पाठिशी ते सदैव उभे असतात, व योग्य ते मार्गदर्शन करतात, त्यामुळे त्यांचे हे उल्लेखनीय कार्य पाहून त्यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे,
उर्वरित कार्यकारिणी, शिवकुमार ऋषींद्र राऊत- जिल्हा उपाध्यक्ष, पवन रामेश्वर काकड-जिल्हा सचिव, करण महेश शिंदे-जिल्हा कार्याध्यक्ष,आकाश राम मोरे- शहर अध्यक्ष,ऋषीकेश पांचाळ-शहर उपाध्यक्ष,देवेंद्र रामेश्वर उपरे-तालुका अध्यक्ष, या सर्वांच्या नवीन निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे व असोसिएशनचे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.



