श्रीराम सेना सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी श्री, सियाराम मिश्रा यांची नियुक्ती…..
श्रीराम सेना सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी श्री, सियाराम मिश्रा यांची नियुक्ती…..
मुळ चंद्रपूर जिल्हाचे रहिवासी असलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री, सियाराम मिश्रा मागील ४४ वर्षांपासून मुंबई महानगर पालिका येथे वास्तव्य करीत आहेत. श्री, एस. मिश्रा यांनी आजच्या घडीला मुंबई येथे अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत. त्यांनी गरीब लोकांचे अनेक प्रश्न सोडविणे, मुंबई मधील वेगवेगळ्या भागातील अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडणे, अनेक धार्मिक कार्यात मोलाचे सहकार्य करणे, अशी अनेक सामाजिक कार्य करून त्यांनी मुंबई येथे एक उत्कृष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनून वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळेच समाजामध्ये आज त्यांना एक मोलाचे स्थान मिळाले असून ‘मिश्रा साहेब ‘मनून आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखतात. आणि श्रीराम सेना सामाजिक संघटनेच्या संघटनात्मक बांधणीत व धार्मिक कार्यात अनेक वर्षापासून मोलाचे कार्य केल्यामुळे या कार्याची दखल घेऊन ‘श्रीराम सेना सामाजिक संघटनेचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष श्री, रणजित सफेलकर यांचे कडून दिनांक २९/०९/२०२० रोज मंगळवारला श्री, सियाराम मिश्रा यांची “श्रीराम सेना सामाजिक संघटनेच्या” महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली. या नियुक्ती बद्दल श्री, सियाराम मिश्रा यांना चंद्रपूर जिल्हा, मुंबई महानगर पालिका क्षेत्र तसेच मित्र आणि नातेवाईक परिवाराकडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.



