!! शाई म्हणून जगावं !!
!! शाई म्हणून जगावं !!, कवी-एन.पी.ढाेलणे
विदर्भ 24न्यूज-जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:-
!! शाई म्हणून जगावं !!
कधीकधी वाटतं द्रवरुप व्हावं.
पेनातील शाई म्हणून जगावं…
असं सुंदर मस्त कागदावर उतरुन,
काहितरी वेगळं गर्भित रहस्य
सहज साेप्या भाषेत सर्वांना सांगावं.
अनं दु:खी जनांना मायेची ऊब द्यावी.
अनं लखपतीच्या वाड्यात जाऊन जनकल्यानाच्या
चार गाेष्टी सांगाव्यात.
मुडद्यांना जागं करावं.
आणि शाहण्याला,त्यापेक्षाही वर अधिक आहे,
ह्याची जाणीव जाग्रुती करुन द्यावी.
लेखनीवर प्रेम करावं.
तीच्यात एकरुप हाेऊन समाजहित,
जगपाेशिंदा हाेणारं पाेर जन्मास घालावं !
खरच…वाटतं द्रवरुप व्हावं.
पेनातील शाई म्हणून जगावं !
📝 कवी-एन.पी.ढाेलणे



