ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात…..
- ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात…….
कवठी प्रतिनिधी :
ग्रामपंचायत कवठी अंतर्गत, येत असलेल्या कवठी येथील, कवठी – रुद्रापूर कडे जाणाऱ्या रस्त्याला लागून दशरथ चुधरी यांचे घरापासून ते इंदिराबाई चौधरी यांचे घराप्रर्यन्त नालीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. आणि बल्की देव चौकातून – रुद्रापूर कडे जाणारा रस्ता त्याच नालीवरून जात असल्याने आणि त्याच परिसरात सार्वजनिक (सरकारी ) हातपंप असल्याने हातपंपाचे पाणी आणि नालीचे पाणी एकाच नालीद्वारे रस्त्यापलीकड सोडण्यासाठी रस्त्याला फोडून रस्त्यावर कच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु या वर्षी पावसाळा अगोदर नालीतील गाळ काढण्याचे काम योग्य वेळी न केल्यामुळे कच्या पुलातील नालीत गाळाचे प्रमाण वाढल्याने पावसाळ्यात नाली ओव्हरफ्लो (अधिक ) होऊन हातपंपा सभोवताल भागात नालीचे खराब पाणी साचल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोखा निर्माण झाला होता. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने काही दिवसांनंतर नालीतील गाळ काढण्याचे काम केले. परंतु २०-२५ दिवस उलटूनही नालीतील खराब गाळ गावाबाहेर न टाकता ती नालीलगतच टाकून ठविलेली असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि कच्या पुलाचे, चांगले भक्कम बांधकाम न करता तात्पुरते त्यावर फक्त सिमेंट च्या 3 पाट्या मांडून ठेविण्यात आल्याने रस्त्यावरून जाण -येन करणे कठीण जात आहे. आणि त्या भागात एकच हातपंप असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना पाणी भरताना आपलं जीव मुठीत धरूनच पाणी भरावे लागत असल्यामुळे . ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.



