मेंढोली येथे शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात वक्त्यांचा सुर
वणी : शहीद ए आजम भगतसिंग हे सर्व क्रांतिकारकांमध्ये वेगळे ठरले, कारण भगतसिंगांना फक्त देशाला स्वातंत्र्यच हवे नव्हते तर शोषणविरहित, समाजवादी पायावर उभी असलेली समाजव्यवस्था हवी होती व म्हणूनच त्यांच्या संघटनेचे नाव हिंदुस्थान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन असे होते आणि हेच कार्य कम्युनिस्ट पक्ष करीत आहे, त्यामुळे शहीद भगतसिंगांच्या विचाराची लढाई, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कम्युनिस्ट चळवळ सातत्याने संघर्ष करीत आहेत, असे ठोस प्रतिपादन कॉ शंकरराव दानव यांनी मेंढोली येथे शहीद भगतसिंग यांचे जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून केले.
शहीद भगतसिंग यांचे जयंतीनिमित्त मेंढोली येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभा च्या नामफलकाचे अनावरण कॉ शंकरराव दानव यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळेस कॉ कुमार मोहरमपुरी यांनी “तरुणांनी भगतसिंग यांच्या विचाराला अंगिकारावे व त्यांच्या संघर्षाला सामोरे न्यावे” असे आवाहन केले तर दिलीप परचाके यांनीं “भगतसिंग यांना शोषणविरहित समाजवादी समाजव्यवस्थेची प्रेरणा सोविएत रशिया येथे झालेल्या लेनिन यांनी केलेल्या समाजवादी क्रांतीतून झाली,त्यामुळेच त्यांची चळवळ ही कम्युनिस्ट चळवळ होती” असे सांगितले.
या झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ शंकरराव दानव हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून कॉ कुमार मोहरमपुरी, कॉ दिलीप परचाके तर प्रमुख पाहुणे म्हणून ऋषी कुलमेथे व एकनाथ नालमवार हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ संजय वालकोंडे यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उदयभान आत्राम, दशरथ चिकराम, शंकर नालमवार, सुरेश तिरणकार, प्रकाश कुमरे, हरिश्चंद्र चिकराम, कीर्तन कुलमेथे, सूर्यभान मेश्राम, संभा किनाके,मंगेश नालमवार, प्रभाकर मडावी, देविदास वासेकर, महादेव तोडासे, देवराव पुसनाके, वसंता कोहळे,योगेश शेडमाके, शंकर कुमरे आदिंनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष उपस्थित होते.



