पंचायत समितीच्या सभापती कु. अल्का आत्राम यांचे कडून अपंग व दिव्यांग बांधवांना ब्लांकेट तर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण.

भारतीय जनसंघाचे संस्थापक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रेरणास्रोत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भिमणी येथे पंचायत समितीच्या सभापती कु. अल्का आत्राम यांचे कडून अपंग व दिव्यांग बांधवांना ब्लांकेट तर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करुन जयंती साजरी केली व सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी कोरोना संकटकाळात विद्यार्थ्यांना ट्यूशनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देणाऱ्या गावातील अवि गोंधळी अवि कोडापे व विशाल नानगिरवार या तरुणांचे आभार मानले.व आपण या कोरोणासंकटकाळातून लवकरच मुक्त होऊ असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भिमणीचे माजी सरपंच रणजीत पिंपळशेंडे, गणपत फरकडे, पुरूषोत्तम कोडापे, संपत मेश्राम, अशोक कोडापे, दौलत गेडाम, हे उपस्थित होते.