पुसद येथे फार्मसी कृती समिती, महाराष्ट्रच्या वतीने कोरोना योद्धाना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सम्मान करण्यात आला
पुसद येथे नवीन उपक्रम फार्मासिस्ट डे म्हणून साजरा.
यवतमाळ – यवतमाळ येथे कोरोना च्या भयंकर काळात पडद्यामागून काम करणाऱ्या आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची ची सेवा करणाऱ्या फार्मासिस्ट व डॉक्टर्सला आज दि २५ सप्टे. फार्मासिस्ट डे म्हणून साजरा करण्यात आला .त्यावेळी फार्मसी कृती समिती, महाराष्ट्र च्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन त्यांचा सम्मान करण्यात आला.
कोरोना काळात अनेक समस्यांवर मत करून आपल्या जीवाची,पर्वा न करता डॉक्टर्स हे आपल्याला अखंड सेवा देत असतात .त्यांच्याच खांद्याला खांदा लावून फार्मासिस्ट सुद्धा दिवसरात्र औषध दुकाने सुरु ठेऊन औषधांच्या कमतरतेने कुणाचे प्राण जाऊ नये,
या अनुषंगाने औषधाची उपलब्दता करीत असतात. त्यांच्या या कार्याला सलाम आहे. अश्या निर्भीड ,निःस्वार्थ कोरोना योध्यांचा सत्कार होणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणे म्हणजेच ,त्यांच्या कार्याला नवचेतना देणे आहे.
करीता ,आज दि.२५ सप्टे .फार्मासिस्ट डे च्या निमित्ताने फार्मसी कृती समिती महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी सुंदर नाईक जिल्हाध्यक्ष,आफताब चव्हाण , जिल्हाउपाध्यक्ष,प्रशांत नरवाडे , जिल्हा सोशल मिडीया अध्यक्ष,आनंद भोयर जिल्हा कार्याध्यक्ष ,संकेत ठाकरे जिल्हा सचिव ,ऋषिकेशचोरे पुसद तालुका अध्यक्ष ,वेदांत देशमुख पुसद तालुका उपाध्यक्ष हे सर्व उपस्थित होते.



