बालसंरक्षण व पोषण माह अभियान कार्यक्रमाचे आयोजन
बालसंरक्षण व पोषण माह अभियान कार्यक्रमाचे आयोजन
दिनांक 24/09/2020 रोज गुरुवार ला जिल्हा महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व अंगणवाडी केंद्र गोविंदपूर यांच्या वतीने बालसरक्षण व पोषण माह अभियान कार्यक्रमाचे आयोजन जि. म.बा. वि. अधिकारी नारायण परांडे व जि. बा. स.अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अंगणवाडी सेविका चांदूबाई रामटेके हे होते. तर मार्गदर्शक म्हणून रविंद्र बंडावार क्षेत्र कार्यकर्ता जि. बा.स.कक्ष गड. यांनी मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 या कायद्याविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली तसेच ग्राम बाल संरक्षण समिती ची कार्य पध्दती व रचना याविषयी मार्गदर्शन केले आणि गावात बाल विवाह होत असल्यास त्यासंदर्भात माहिती देणे. तसेच कोविड 19 या आजारापासून बालकांची योग्य स्वरूपात काळजी घेण्यात यावी.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंगणवाडी सेविका यांनी बालकांना अंगणवाडी मधून मिळणारा आहार आपल्या बालकांना दररोज देण्यात यावे आणि आपल्या घरी वेगवेगळे वस्तू पदार्थ बनवून बालकांना खाऊ घालावे असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. यावेळी गावातील महिला उपस्थित होते. तसेच अंगणवाडी केंद्र गोविंदपूर, जी.प.शाळा प्रा. आरोग्य उपकेंद्र, आश्रमशाळा गोविंदपूर व गावातील समुदाय यामद्ये जाऊन पोक्सो अक्ट, बालविवाह संदर्भात पोस्टर बॅनर लावून जनजागृती करण्यात आली.



