दिड वर्षांपासून DG लोन संदर्भात अर्ज दाखल केलेल्या पोलीस बांधवाना दिवाळी पर्यंत न्याय द्या-अन्यथा रस्त्यावर उतरणार

-पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांचा सरकारला इशारा
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/उस्मानाबाद:-एप्रिल२०१९ पासून महाराष्ट्रातील सुमारे ३००० पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी गृहकर्जासाठी DG लोन साठी कागपत्रे दाखल करून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे तरी अद्यापही या सरकारने या प्रकरणाबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही. DG लोन घेण्यासाठी खरं तर २ते ३ महिन्याचा कालावधी लागतो, कागदपत्रांची पूर्तता कायदेशीर रित्या पूर्ण केलेल्या पोलीस बांधवांना लोन देण्याचे आदेश महासंचालक कार्यालयाकडून बँकांना दिले जातात , परंतु यावेळेस दीड वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने अर्ज दाखल केलेल्या पोलीस बांधवांमध्ये तीव्र प्रकारची नाराजी पसरली आहे, त्यामुळे अनेकांचे घरबांधणीचे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आम्हाला फोन करून DG लोन तात्काळ मिळवून देण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनने आमच्या पाठीशी उभे रहावून आम्हाला सहकार्य करावे असे सांगत असल्याचेही संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी म्हटले आहे. एकीकडे कोरोना सारख्या महामारीचा सामना करण्यासाठी आमचे पोलीस बांधव रस्त्यावर उतरून दिवसरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहेत, तर दुसरीकडे DG लोनच्या विश्वासावर अनेकांनी आपले प्लॉट – जागा दुसरीकडे गहाण ठेवली आहे काहींनी व्याजाने पैसे काढून अर्धवट बांधकाम केले असल्याचे समजते तर काहींना आहे तीच जागा हातातून जात असल्याने भीती वाटत आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब , उपमुख्यमंत्री अजित ( दादा ) पवार साहेब तसेच गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांनी राज्यामध्ये जीवाची पर्वा न करता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असणाऱ्या खाकी वर्दीतील आमच्या आई – वडिलांचा – भावाचा व बहिणीचा माणुसकीच्या नात्याने विचार करून त्यांचे DG लोन दिवाळीपर्यंत मंजूर करण्याचे आदेश देण्यात यावे, अन्यथा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी सरकारला दिला आहे.
महराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यास व होमगार्ड सैनिकांना काही समश्या असल्यास
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन
महाराष्ट्र राज्य यांनी खालील फोन नंबर ला संपर्क साधण्यास आव्हान केले आहे 9604972682, 8669838008