शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही – डार्विनकोब्रा
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही – डार्विनकोब्रा
==============================
तलावाचे पाणी शेतकऱ्यांना द्या अन्यथा आंदोलन – भारतीय क्रांतिकारी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
म्हसली येथील शेतकऱ्यांना कित्येक वर्षांपासून न. सि. तलाव तेली मेंढा इथल्या तलावाचे पाणी मिळत आहे व नियमितपणे पाणी पट्टी भरणा रक्कम सुद्धा भरत आहेत. परंतु सन 2019- 20 यावर्षी लघु सिंचन विभाग जि. प. ने जय किसान पाणीपुरवठा संस्था यांचेकडे न. सि. तलाव तेली मेंढा तलाव दिला. यावर्षी बऱ्यापैकी पाऊन पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान नुकसान होईल. या 25 ते 30 एकर असलेल्या शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज असल्याने म्हसली येथील शेतकऱ्यांनी शेतीला तात्काळ तलावाचे पाणी सोडावे अशी मागणी केली मात्र असे न करता पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष दिगांबर गुरपुडे यानीं 20 ते 25 एकर शेतीला बुद्धिपुरसर वगळून इतरांना पाणी सोडण्यात आले. शेतीला पुरक पाणी मिळत नसल्याने 20-25 एकर शेतीचे नुकसान होणार आहे. या कृत्याचा शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करून दिंगाबर गुरपुडे याचे विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी भारतीय क्रांतिकारी संघटनेनी पुढाकार घेऊन तलावाचे पाणी मिळण्यापासून वंचित असलेल्या 20 ते 25 एकराच्या शेतकऱ्यांना न. सि. तलावाचे पाणी तात्काळ देण्यात यावे अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने डार्विन कोब्रा यानी लघु सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता यानां निवेदनाद्वारे केली.
शेतात राबून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय भारतीय क्रांतिकारी संघटना कदापिही सहन करणार नाही व शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी न मिळाल्यास भारतीय क्रांतिकारी संघटनेचे वतीने कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करू असा इशारा भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानी निवेदनाद्वारे दिला.
यावेळी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, तालुका महासचिव अविनाश नवघडे, किशोर समर्थ, चंद्रशेखर नारायणे, राजेंद्र भोयर, रमेश महाजन, सुनील बनकर, सुशील मेश्राम इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.


