“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेत सहभागी व्हावे – विजय कोरेवार सभापती पंचायत समिती सावली
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेत सहभागी व्हावे – विजय कोरेवार सभापती पंचायत समिती सावली
सुरेश कन्नमवार
सावली – कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बाहेर पडताना नेहमी मास्क वापरणे, वारंवार साबणाने हाथ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे परंतु प्रत्यक्षात या बाबी होताना दिसत नाही. उलट वॉट्सअप्पवरील किडनी काढतात, दीड लाख अधिकाऱ्यांना मिळतात अशा अफवांच्या पोस्टमुळे एखादा रुग्ण पोजिटिव्ह आल्यानंतरही संपर्कातील व्यक्ती प्रशासनाकडून टेस्ट करण्याकरिता सांगितल्या नंतरही भीतीपोटी अनेक लोक टेस्ट करण्याकरिता येत नाहीत, आजार असतानाही माहिती देत नाही, अरेरावीची भाषा वापरतात. यामुळे संसर्ग वाढत चाललेला आहे.
सध्या जे रुग्ण बाधित झालेले आहेत त्यातील बऱ्याच रुग्णांना लक्षणे दिसून येत नसल्याने इतरांना संक्रमण होऊ नये याची दक्षता घेत दवाखान्यात न ठेवता अलगिकरण कक्षेत ठेवले आहेत . जे रुग्ण दुर्लक्ष केले त्यांचा आजार वाढल्यामुळे त्यांनाच रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात येते. आज परिस्थिती चंद्रपूर येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झालेले असल्यामुळे कोरोना आजाराबाबत आताच सतर्क होणे गरजेचे आहे.
“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही मोहिम सावली तालुक्यात राबविण्यात येत आहे. यासाठी गावात ३ व्यक्तींचा एक पथक आपल्या घरापर्यंत येणार आहे. या मोहिमेंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा थर्मामीटरने ताप व ऑक्सीमिटरने शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण मोजण्यात येणार आहे.
त्यामुळे सावली तालुक्यातील जनतेला विनंती आहे की अजुन वेळ गेलेली नाही. प्रशासनाला सहकार्य करा नियम पाळा. ताप, सर्दी, खोकला, शरीरात अशक्तपणा जाणवणे, ऑक्सिजन कमी असणे अशी लक्षणे आढळल्यास माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतील व्यक्तींना माहिती देऊन त्वरित टेस्ट करून घ्यावी. जितक्या लवकर टेस्ट केली जाईल तितक्या लवकर योग्य औषधोपचार आणि विलगिकरण करून प्रसार रोखता येतो.
टेस्ट केली तर पोजिटिव्ह काढतात ही पूर्णतः अफवा असून आता पर्यंत सावली तालुक्यात ३४३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहेत त्यापैकी ३०७६ नमुने ९०% निगेटिव्ह आलेले आहेत. रुग्णामध्ये कोरोना आजाराचे संक्रमण असेल तरच टेस्ट पोजिटिव्ह येणार. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता तपासणी करीता पुढे या.
गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सुशिक्षित व्यक्ती यांनीही पुढाकार घेऊन गावातील व्यक्तींची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हाहन विजय कोरेवार सभापती पंचायत समिती सावली यायाा यानी केले आहे.


