पोलीस बॉईज असोसिएशन अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदी अनुप राजकुमार परबत यांची निवड
पोलीस बॉईज असोसिएशन अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदी अनुप राजकुमार परबत यांची निवड..
विदर्भ 24न्युज
अमरावती: २१सप्टेंबर रोजी धामणगाव रेल्वे येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज अनुप राजकुमार परबत यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, असे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जाहीर केले आहे, अमरावती पोलीस बॉईज असोसिएशनची कार्यकारणी बरखास्त केल्यामुळे गेल्या वर्षभरापासून पोलीस बॉईज असोसिएशनचे अमरावती मधील कार्य बंद होते , त्यामुळे आता नवीन नियुक्ती करून कामाला जोमाने सुरुवात होईल असेही प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे, अमरावती मधील पोलीस बांधवांनी आपल्या समस्या असतील तर नवीन जिल्हा उपाध्यक्ष अनुप परबत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष यांनी केले आहे. नूतन जिल्हा उपाध्यक्ष अनुप परबत यांना पोलीस बॉईज असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.




