गडचिरोली शहरात आजपासून २३ ते३० पर्यंत आठवडाभर ‘जनता कर्फ्यू’
गडचिरोली शहरात आजपासून २३ ते३० पर्यंत आठवडाभर ‘जनता कर्फ्यू’
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली : शहरात जनता कर्फ्यूला आज बुधवार २३सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे. त्यामुळे काल शहरातील मार्केट विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळी होती. गडचिरोली शहरातील कोरोनाच्या प्रसाराला आवर घालण्यासाठी व्यापारी आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार पुकारला असून, एका आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यू होण्यासोबतच ९३ नवीन रुग्णांची बुधवारी वाढ झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील ५७ वर्षीय कोरोनाबाधित आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ते चामोर्शी तालुक्यात एमपीडब्लू म्हणून कार्यरत होते. ५६ जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ४९० झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा प्रथमच दोन हजारांच्या टप्प्यावर गेला. २ हजार ८६ बाधितांपैकी १ हजार ५८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र १४ जणांना जीवही गमवावा लागला .
नवीन ९३ बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील ३३ जण आहेत. याशिवाय विविध तालुक्यातील सिरोंचा ३ , कोरची ६ , कुरखेडा १० , चामोर्शी १ , एटापल्ली ३ , भामरागड २ तथा मुलचेरा येथील २ जणांचा समावेश आहे. शहरात खरेदीसाठी झाली मार्केटमध्ये गर्दी आठवडाभराच्या जनता कर्फ्यूमध्ये सर्व प्रकारच्या वस्तूंसह भाजी विक्रीही बंद राहणार असल्याचे सांगितल्यामुळे शहरवासियांनी मंगळवारी बाजारात चांगलीच गर्दी केली होती. विविध वस्तूंच्या खरेदीसह गुजरीच्या भाजी मार्केटमध्येही संध्याकाळी अंधार पडेपर्यंत सुरु होते. संध्याकाळी शहर पोलिसांनी सायरन वाजवून चकरा मारल्यामुळे मार्केटमधील दुकान बंद करण्यात आली.



