खाजगी जम्बो कोविड सेंटरमध्ये ५० टक्के बेड गरिबांसाठी आरक्षीत ठेवा – आ. किशोर जोरगेवार

गरिबांच्या बेडला लागणारा खर्च महानगर पालीकेने करावा, तर आरक्षित बेडवर आलेल्या रुग्णांच्या ओषधांचा खर्च आमदार निधीतून देणार,
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंद्रपूरात ७०० खाटांचे खाजगी जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने परवाणगी देण्यात आली आहे. मात्र सर्व सामान्य कुंटूबातील रुग्णांना या कोविड सेंटरमधील उपचार न परवडण्यासारखा आहे. त्यामुळे अशा संकटाच्या परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करत या जम्बो कोविड सेंटरमधील ५० टक्के खाटा गरिबांसाठी आरक्षीत ठेवण्यात याव्यात, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना केल्या असून या आरक्षीत बेडचा खर्च महानगर पालिकेने दयावा तर या बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या औषधांचा खर्च आमदार निधी, खनीज विकास निधीच्या माध्यमातून आम्ही करू असेही आ. जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून म्हटले आहे.