पोंभुर्णा येथे पंतप्रधान नरेद्रंजी मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

पोंभुर्णा येथे पंतप्रधान नरेद्रंजी मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
भारताचे पंतप्रधान नरेद्रंजी मोदी यांच्या वाढदिवसाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तालुका पोंभुर्णा च्या वतिने श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजीत करण्यात आला होता. यावेळी दिव्यांग दुर्याधन तुळशिराम ढोले यांच्या हस्ते केक कापण्यात आला. सकाळी प्राथमिक स्वास्थ्य केद्रं नवेगांव मोरे आणि पोंभुर्णा येथे फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर राजराजेश्वर देवस्थान परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटिवार, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, प.स.सदस्य विनोद देशमुख, नगराध्यक्षा स्वेता वनकर, उपनगराध्यक्षा रजिया कुरेशी, नगरसेवक ईश्वर नैताम, नगरसेवक अजित मंगळगिरीवार, नगरसेवक मोहन चलाख, विजय कस्तुरे , तसेच नगरसेविका सुनिता मॕकलवार, नगरसेवक शारदा कोडापे, नगरसेवक नेहा बघेल, प्रसिद्धी प्रमुख दिलीप मॕकलवार,माजी उपसभापती मनोज रणदिवे, राजु ठाकरे, भाजपा युवा मोर्चा चे आदित्य तुम्मुलवार, महेंद्र सोनुले, विनोद कानमपल्लीवार आदि उपस्थित होते.