राजुर गावात वणी प्रशासनाचे पोलिस उपनिरिक्षक प्रताप बाजड , स .पो .उपनिरीक्षक डी बी.भादिकर व त्यांचा टिमनी घेतली दखल
– मास्कविना फिरणाऱ्या लोकांवर केली कारवाई .
वणी- तालुक्यातील राजुर गावात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव व एका पाठोपाठ मृत्यु होत असतानाविदर्भ 24 न्यूज़ ह्यांनी वृत्त प्रकाशित केलेली बातमीच्या परिणाम आज गावात दिसून आला.परिणामी वणी विभागातील पोलिस अधिकारीवर्ग राजुर येथे येऊन त्यानी मास्कविना फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी विनामास्कने असणाऱ्यावर कारवाई केल्या .त्यांचा ह्या कार्याने गावातील नागरिक हे सावधान झाले आहे.त्यात महत्वपूर्ण म्हणजे त्यातील डी .बी भादिकर व वणी येथील पी.एस .आय बाजड ह्यांनी संपूर्ण राजुर गावातील प्रत्येक गल्लीची पाहणी पायदड केली व सर्व दुकानदारांना सूचना दिल्या .गावातील लोक वणी पोलिस विभागातील सर्व स्टाफबाबत कौतुकास्पद चर्चा सुरु आहे. व 4 ते 5 कारवाई केल्या .
त्यांचा ह्या कारवाईने गावात एक शिस्त दिसून येत आहे. कारण त्यांना असे लक्षात आले की ,पोलिस हे खरच प्रत्येक क्षणि कामात तत्पर असतात म्हणून आज त्यांना सर्व कोरोना योद्धा सुद्धा म्हणतात.गावातील प्रशासन मात्र जैसे थे….. ची भूमिका आणखी एकदा गावातील लोकांना दिसून आली. बाहेरील प्रशासनाला जाग आला आणि कार्रवाया झाल्या मात्र गावातील प्रशासन अद्यापही निद्रा अवस्थेत का ????



