राजनगट्टा येथे खेळांच्या साहित्याचे वितरण
- राजनगट्टा येथे खेळांच्या साहित्याचे वितरण
राजनगट्टा येथे खेळांच्या साहित्याचे वितरण
कवठी प्रतिनिधी
खेळ हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून सद्या ते करियर करण्याचे एक क्षेत्र झाले आहे परंतु योग्य ते खेळ, साहित्य व योग्य तो मार्गदर्शन न मिळाल्याने क्षमता असून देखील गावातील अनेक युवक या क्षेत्रात करियर करू शकत नाही अशातच नेहरू युवा केंद्र, गडचिरोली च्या वतीने छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टाच्या विद्यार्थी व युवकांचा शारीरिक आणि मानसिक विकास, खेळाच्या माध्यमातून शरीर अवयवाच्या हालचाली होऊन शरीर सुदृढ आणि निरोगी व्हावे. व गावातील युवक कोणत्याही क्षेत्रात मागे पडू नये या दृष्टीने (व्हॉली बॉल, फूटबॉल, क्रिकेट बॅट, गोळा,नेट,चेस) या सारख्या खेळाचे साहित्यांचे वितरण करण्यात आले. खेळाचे साहित्य मिळवून देण्यात अमित पुंडे, (DYC)गडचिरोली सोबतच पवन आभारे (NYV),चामोर्शी आणि विनोद मडावी (NYV) चामोर्शी यांची मोठी भूमिका होती. त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष उमेश भांडेकर, सचिव अनुप कोहळे व मंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सदर साहित्यांचा स्वीकार करत नेहरू युवा केंद्र, गडचिरोली चे आभार व्यक्त केले.



